Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जळगावच्या गोदावरी रुग्णालयात पावसाचं पाणी शिरल्याने रुग्णांचे हाल

मुसळधार पावसामुळे रात्री जळगावच्या गोदावरी रुग्णालयात पावसाचं पाणी शिरलं.

जळगावच्या गोदावरी रुग्णालयात पावसाचं पाणी शिरल्याने रुग्णांचे हाल

जळगाव : मुसळधार पावसामुळे रात्री जळगावच्या गोदावरी रुग्णालयात पावसाचं पाणी शिरलं. या दरम्यान गोदावरी रुग्णालयात रुग्ण आणि रुग्णांच्या परिवाराला नरक यातना भोगाव्या लागल्या आहेत. भर पावसात रुग्ण आणि परिवाराला रात्रभर मुसळधार पावसात उभे केले गेले. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी या रुग्णाला कोणतेही सहकार्य न करता रुग्णालयात प्रवेश देण्यास सक्त मनाई केली. तर सकाळी डॉक्टर नसल्याने दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला गेला. खाजगी वाहनाला पैसे नसल्याने या परिवाराने मदतीचे आवाहन केले.

या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरही उपचार सुरु आहेत. रुग्णालयाच्या तळमजल्यात पाणी शिरल्याने रुग्णांचे यामुळे मोठे हाल झाले. अशा संकटाच्या काळात गोदावरी रुग्णालयाची वैद्यकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. रुग्णालयात पाणी शिरल्यानंतर प्रशासनाने देखील याची दखल घेतली नाही. अनेक रुग्णांना पाण्यातच रात्र काढावी लागली.

Read More