Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मध्य रेल्वेचा दोन दिवस पॉवर ब्लॉक, कसारापर्यंतच्या लोकल शॉर्ट टर्मिनेट करणार

शनिवारी आणि रविवारी कसारा स्थानकावर पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वेचा दोन दिवस पॉवर ब्लॉक,  कसारापर्यंतच्या लोकल शॉर्ट टर्मिनेट करणार

मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकावर शनिवारी आणि रविवारी पादचारी पुलाच्या पहिल्या टप्प्यातील गर्डरच्या लाँचिंगसाठी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा पॉवर ब्लॉक तीन टप्प्यात होणार आहे. यातील पहिला ब्लॉक आज सकाळी 11.40 ते दुपारी 12.10 या वेळेत असणार आहे; तर दुसरा आणि तिसरा ब्लॉक उद्या सकाळी 11.40 ते दुपारी 12.10 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 4.25 पर्यंत असणार आहे. ब्लॉक कालावधीत कसारापर्यंतच्या लोकल शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. 

मध्य रेल्वेने कसारा रेल्वे स्थानकात उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी हा पॉवर ब्लॉक करण्यात येत आहे. त्यामुळे या सेक्शनमध्ये शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी असे तीन पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी शनिवारी रात्री आणि रविवारी प्रवास करताना लोकल गाड्यांची स्थिती जाणूनच प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. तसेच रविवारी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकल बंद असणार आहेत. शनिवार 08 मार्च 2025 आणि रविवार 09 मार्च 2025 रोजी कसारा स्थानकावर आरओबी गर्डर ( टप्पा-१ ) च्या लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री, तर मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड अप तसेच डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकावर आरओबीच्या गर्डर लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक शनिवारी आणि रविवारी घेण्यात येणार आहे. 

पश्चिम रेल्वेवर असा ब्लॉक  पश्चिम रेल्वेच्या वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री 11.30 ते रविवारी पहाटे 3.30 या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मध्य आणि हार्बर रेल्वे 

 मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड अप तसेच डाउन जलद मार्गावर रविवारी सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.40 या कालावधीत सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रेदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटीवरून वाशी/बेलापूर/पनवेल आणि वांद्रे/गोरेगावसाठी सेवा उपलब्ध नसेल. मात्र या कालावधीत पनवेल -कुर्ला- पनवेलदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. 
हार्बर लाइनच्या प्रवाशांना 5 सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील स्टेशनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. 

Read More