Pranjal Khewalkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचा जावई प्राजंल खेवलकरला पुण्यातील एका रेव्ह पार्टीमधून अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात खेवलकरविरोधात धक्कादायक खुलासे झाले आहेत. बीडमधील एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, ज्यामुळे खेवलकरच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे परप्रांतीय मुलींचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात त्यांनी कठोर पावले उचलली असून या संदर्भात पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहित चौकशीचे आदेश दिले आहेत. (Pranjal Khewalkar Booked a room 28 times and called girls Complaint for maharashtra state commission for women human trafficking pune rave party Rohini Khadse reaction)
बीडमधील सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला तक्रार केली आहे. या तक्रारमध्ये असं सांगण्यात आले की, पुण्यात ज्या रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला त्यातील आरोपी प्रांजल खेवलकरने 28 वेळा स्वतःच्या नावांने हॉटेल रुम बुक करुन अनेक वेळा परप्रांतीय मुलींना आमिष दाखवून बोलावले होते. हे प्रकरण संघटित गुन्हेगारीचे तसंच मानवी तस्करीचे असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केली आहे. त्यामुळे या तक्रारीची दखल घेत महिला आयोगाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. आयोगाने पुणे पोलीस आयुक्तयांना सदर प्रकरणाची मानवी तस्करी विरोधी पथक, सायबर विभाग यांचे मार्फत तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर करावा लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगास कु. सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. सदर अर्जदाराने अर्जात, पुण्यात ज्या रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला त्यातील आरोपी श्री. प्रांजल खेवलकर यांनी २८ वेळा स्वतःच्या नावांने हॉटेल रुम बुक करुन अनेक वेळा..१/२
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) August 5, 2025
दुसरीकडे एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन काही मुद्दे उपस्थितीत केले आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय की, नुकतेच माध्यमांतून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले.
मुद्दा क्र. 1 ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे.
मुद्दा क्र. 2 राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडले, वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणासारखे हुंडाबळीचे प्रकरण घडले. यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत. तेव्हा ही संस्था कुठे होती ? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती ? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली ?
नुकतेच माध्यमांतून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) August 6, 2025
मुद्दा क्र. १ ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड… pic.twitter.com/t33Ku3aEed
मुद्दा क्र. 3 राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्याला महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसे कर्तव्य आठवले ? इतके कसे कार्यतत्पर झाले ?
आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार...सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली.
1. प्रांजल खेवलकरला कोणत्या प्रकरणात अटक झाली आहे?
प्रांजल खेवलकरला पुण्यातील एका रेव्ह पार्टीमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याच्याविरोधात मानवी तस्करी आणि संघटित गुन्हेगारीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
2. बीडमधील कोणत्या संस्थेने तक्रार दाखल केली आहे?
बीडमधील सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
3. सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची तक्रार काय आहे?
तक्रारीनुसार, प्रांजल खेवलकरने 28 वेळा हॉटेल रूम बुक करून परप्रांतीय मुलींना आमिष दाखवून बोलावले होते. यामुळे हे प्रकरण मानवी तस्करी आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित असल्याचा संशय आहे.
4. राज्य महिला आयोगाने याप्रकरणी काय कारवाई केली आहे?
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून मानवी तस्करी विरोधी पथक आणि सायबर विभागामार्फत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांना या कारवाईचा अहवाल आयोगाला सादर करावा लागणार आहे/.
5. रोहिणी खडसे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कोणते मुद्दे उपस्थित केले आहेत?
रोहिणी खडसे यांनी खालील मुद्दे उपस्थित केले: मुद्दा 1: तक्रार करणारी सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बीड जिल्हा महिला विभागाच्या अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे.
मुद्दा 2: राज्यात महिलांवरील अत्याचार आणि वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणासारख्या घटनांमध्ये ही संस्था कुठे होती? अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप असताना ही संस्था का गप्प होती?
मुद्दा 3: महिलांवरील अत्याचारांबाबत काहीच न करणाऱ्या महिला आयोगाला आता अचानक कर्तव्याची आठवण कशी झाली?