Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आरारा... रा... रा... खतरनाक... प्रवीणभाऊ आमदार होणार?

आता भाऊचा बर्थडे बर्थडे न म्हणता प्रवीण तरडे यांच्यासाठी भाजप कार्यकर्ते भाऊचा प्रचार...भाऊचा प्रचार...असं म्हणतील तर आश्चर्य वाटून घेऊन नका. कारण 

आरारा... रा... रा... खतरनाक... प्रवीणभाऊ आमदार होणार?

पुणे : आता भाऊचा बर्थडे बर्थडे न म्हणता प्रवीण तरडे यांच्यासाठी भाजप कार्यकर्ते भाऊचा प्रचार...भाऊचा प्रचार...असं म्हणतील तर आश्चर्य वाटून घेऊन नका. कारण मुळशी पॅटर्न फेम दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण तरडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मुळशी मतदारसंघात भाजपाकडून चाचपणी सुरू आहे. प्रवीण तरडे यांना तिकीट देण्यासाठी हलचाली सुरू झाल्या आहेत. 

दरम्यान, झी २४ तासशी बोलताना भाजपाकडून याबाबत विचारणा झाल्याचं प्रविण तर्डे यांनी सांगितलं आहे. प्रवीण तरडे सध्या लंडनमध्ये असून, दोन ते तीन दिवसात भारतात परतणार आहेत. त्यानंतर नेमकी भूमिका स्पष्ट होऊ शकेल. 

Read More