Pravin Darekar on SIT Inquiry : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केलेल्या विधानांवरुन विशेष समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले आहेत. त्यावेळी बोलताना भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली आहे. प्रविण दरेकर यांच्या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेत गोंधळ घातल्याचं पहायला मिळालं.
प्रविण दरेकर काय म्हणाले?
शरद पवार मनोज जरांगे यांना फोन करायचे, त्यांच्या आंदोलनाचा खर्च देखील त्यांनीच केलाय. शरद पवार जसं सांगतात, तसं जरांगे करतात, असा आरोप संगीता वानखेडे (Sangita Wankhede) यांनी केला होता. त्यावर प्रविण दरेकर यांनी सभागृहात मोठं वक्तव्य केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी शिवराळ भाषा वापरणाऱ्या जरांगेविरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे.
राज्यामध्ये जर कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचवायचा प्रयत्न होत असेल तर ते कोणीही असो त्याचे प्लॅनिंग करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे, असंही दरेकर म्हणाले आहेत.
-विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) February 27, 2024
-दिवस २ रा.
उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांच्या विषयी शिवराळ भाषा वापरणाऱ्या जरांगेविरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२४ pic.twitter.com/dnH9FL7mwN
मनोज जरांगे म्हणतात...
शरद पवार यांना मी नंतर कधीच बोललो नाही. मी कोणाचीच मदत घेतली नाहीये. ते आले मग मी त्यांना हकलून लावायचं होतं का? मला राज ठाकरे ना उद्धव ठाकरेंची मदत मिळाली. ना बच्चू कडू ना नाना पटोले यांची कोणाचीच मदत मिळाली नाही. त्यांची साथ नक्की असेल माझ्यावर पण मला मदत कोणीही केली नाही. मराठ्यांना रचलं गेलं हे मी आधीपासून सांगत होतो. फडणवीसांनी मुद्दामहून एसीपी आणि पीआय यांना सांगून हे करायला लावलं. गुन्हे मागे घेतो म्हणाले पण ते देखील घेतले नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.