Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

प्राध्यापक ओरडल्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारली

या घटनेनंतर साऱ्या शहरभर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

प्राध्यापक ओरडल्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारली

औरंगाबाद : परीक्षा सुरू असताना प्राध्यापक ओरडले, म्हणून एका 19 वर्षीय मुलानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं पुढे आलं आहे. औरंगाबादच्या एमआयटी नर्सिंग कॉलेजमध्ये आज ही घटना घडली. नर्सिंगच परीक्षेचा आज पहिला पेपर होता. सचिन वाघ परीक्षेला गेला होता. तिसऱ्या मजल्यावरून उ़डी मारली. त्याचा हा आत्महत्येचा प्रयत्न कॅमेरात कैद झाला. या घटनेनंतर साऱ्या शहरभर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सचिन वाघची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत. शहरात या घटनेची जोरदार चर्चा आहे. तसेच पालकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे.

Read More