Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अमळनेरमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, गिरीश महाजनांच्या जिल्ह्यातच धरणाचं काम दुर्लक्षित

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला.  

अमळनेरमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, गिरीश महाजनांच्या जिल्ह्यातच धरणाचं काम दुर्लक्षित

जळगाव : जिल्ह्यातील अमळनेरमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला. तापी नदीवरील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रकल्प असलेल्या पाडळसरे सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण व्हावे यासाठी पाडळसरे जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविले. राज्य सरकारने धरणाला निधी न दिल्यामुळे जनआंदोलन समितीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. येथील धरणाचे काम ठप्प आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळापासून काही अंतरावर काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी पोलिसांनी २७ आंदोलकांना अटक केली. अमळनेरमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणाऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली. पळसदरे धरणाचे काम रखडल्याने संताप संतप्त आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातच धरणाचे काम रखडले आहे. सरकारने आश्वासन न पाळल्याने अमळनेरकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. 

सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीसाठी पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. जर धरणाचे काम पूर्णत्वाला गेले असते तर येथील पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली असते. जलसंपदा मंत्र्यांच्याच जिल्ह्यात ही अवस्था असेल तर पाणीप्रश्न कसा सुटणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Read More