Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भीम सैनिकांकडून ठाण्यात लोकल अडवण्याचा प्रयत्न

भीमा-कोरेगाव घटनेला मंगळवारी काही प्रमाणात हिंसक वळण लागल्यानंतर आज भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच काही भागात याला सुरुवात देखील झाली आहे.

भीम सैनिकांकडून ठाण्यात लोकल अडवण्याचा प्रयत्न

मुंबई : भीमा-कोरेगाव घटनेला मंगळवारी काही प्रमाणात हिंसक वळण लागल्यानंतर आज भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच काही भागात याला सुरुवात देखील झाली आहे.

लोकल अडवण्याचा प्रयत्न

ठाणे रेल्वे स्थानकावर काही काळ भीम सैनिकांना रेलरोको केला. काही काळ त्यांना लोकल अडवून ठेवली होती. पण त्यानंतर काही काळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली. ठाण्यात रस्त्यावर रिक्षा आणि इतर वाहतूक सेवा कमी झाल्यानं बाहेर पडलेले नागरिक रस्त्यावर ताटकळत पाहायला मिळत आहेत.

सर्वत्र कडेकोट बंदोबस्त 

राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. भीमा-कोरेगावच्या घटनेबद्दल राग आहे, मात्र जनतेनं संयम बाळगावा असं आवाहनही आंबेडकर यांनी केलं आहे.

Read More