Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या धक्क्यानं खेळाडूचा मृत्यू

नारायणगाव इथल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र तोपर्यंत खेळाडूचा मृत्यू झाला होता.

क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या धक्क्यानं खेळाडूचा मृत्यू

पुणे: मृत्यू कधी कुठे कसा गाठेल याचा नेम नाही. मैदानावर क्रिकेट खेळत असताना असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मैदानावर क्रिकेटचा सामना सुरू असताना खेळाडूचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मैदानावर खळबळ उडाली होती. 

पुण्यातील जुन्नर तालुक्यात एका क्रिकेटपटूचा मैदानावर क्रिकेट खेळताना मृत्यू झाला आहे. महेश विठ्ठल नलावडे असं क्रिकेटपटूचं नाव आहे. जाधववाडी इथं टेनिस बॉल क्रिकेटचे सामने सुरु होते.ओझर संघाचे टेनिस क्रिकेटमधील नामवंत खेळाडून महेश नलावडे खेळ सुरू असताना मैदानावर अचानक कोसळला. 

मैदानावर कोसळल्यानंतर त्याला नेमकं काय झालं हे कुणालाच कळेना. इतर खेळाडूंनी त्याला जागं करण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं खेळाडूचा मृत्यू झाला आहे. नारायणगाव इथल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र त्याआधीच मृत्यू झाल्यानं डॉक्टरांनी खेळाडूला मृत घोषित केलं. या घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Read More