Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या, कोयत्याने सपासप वार करत संपवलं

अक्षयच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद

पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या, कोयत्याने सपासप वार करत संपवलं

पुणे : सोमवार पुण्याच्या दोन महत्वाच्या घटनांनी हादरलं आहे. पुण्यात एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील दत्तवाडी (Dattawadi Pune) परिसरात ही हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या गुंडाचे नाव अक्षय किरतकिर्वे (Akshay Kiratkirve) असे आहे. अक्षयच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या (murder) करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पुणे शहरातील दत्तवाडी परिसरात सायंकाळच्या सुमारास अक्षय किरतकिर्वे याची हत्या करण्यात आली आहे. चौघा जणांच्या टोळक्याने भरदिवसा अक्षय किरतकिर्वे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. हत्या केल्यानंतर या चौघांनीही घटनास्थळावरुन पळ काढला. (पुण्यातील बड्या राजकीय गुरूला अटक) 

fallbacks

 

भरदिवसा पुण्यात झालेल्या या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी केलेल्या या हल्ल्यात गुंड अक्षय किरतकिर्वे हा गंभीर जखमी झाला होता. या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं.  त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

पूर्व वैमनस्यातून ही हत्या केली असावी असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला  आहे. 

पुण्यात शनिवारी बड्या राजकीय गुरूला देखील अटक करण्यात आलं आहे. एका विवाहित स्त्रीचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या पुण्यातील बड्या राजकीय गुरूला चतुःश्रुंगी पोलिसांनी अटक केली आहे.

Read More