Pune Crime: पुण्याच्या दौंडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. दौंडमध्ये अवघ्या साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे नराधमांच्या वासनेपुढे त्यांना वय, काळ वेळ या गोष्टी काहीच नसतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. सध्या या आरोपीला दौंड पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऊसाच्या शेतात नेऊन साडेपाच वर्षाच्या मुलीवर त्याने अत्याचाराचा प्रयत्न केलाय.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय. पुणे सोलापूर महामार्गावर कुरकुंभ परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी येथील नवनाथ चंद्रकांत रिठे या 27 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात दौंड पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून दौंड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल आहे.
16 मे 2025 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची साडेपाच वर्षांची मुलगी ही पुणे-सोलापूर महामार्गावरील भागवत वस्ती येथील किराणा दुकानासमोर उभी असताना आरोपीने तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला दौंड तालुक्यातील मळद गावच्या परिसरातील ऊसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने पीडितेच्या अंगावरील कपडे काढून मारहाण केली तसेच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला.
रविवारी रात्री पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एक असे दृश्य समोर आले ज्याने सर्वांना हादरवून टाकले. १८ वर्षीय कोमल जाधवची भररस्त्यात दोन व्यक्तींनी निर्घृण हत्या केली. दुचाकीवरून आलेल्या दोन्ही आरोपींनी प्रथम तिला बोलावले आणि नंतर तिच्यावर चाकूने हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली कोमल तिथेच पडली आणि तिचा जागीच मृत्युमुखी पडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पण पोलिसांनी जलदगतीने कारवाई केली आणि काही तासांतच दोन्ही आरोपींना अटक केली. चौकशीदरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर हत्येमागील कारणही समोर आले, ज्यामुळे हे प्रकरण आणखी धक्कादायक बनले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमलचे तिच्या घराशेजारी राहणाऱ्या ४५ वर्षीय उदयभान यादवसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये काही काळ मैत्री होती नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या नात्यात पैशाचा व्यवहारही झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतरच हे नातं बदलू लागलं. दोघांमध्ये कशावरून तरी भांडण सुरू होते. या भांडणामुळे उदयभानने कोमलला संपवण्याची योजना आखली. त्याने त्याच्या एका साथीदाराला सोबत घेतले आणि हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात समोर आले.