Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भक्तांच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस मिळवला अन् त्यांचे खासगी क्षण...; पुण्यातील भोंदू बाबाचा प्रताप

Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईल ॲप द्वारे भक्तांचे खाजगी क्षण पाहणाऱ्या भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे. 

भक्तांच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस मिळवला अन् त्यांचे खासगी क्षण...; पुण्यातील भोंदू बाबाचा प्रताप

Pune News Today: दिव्य शक्ती असल्याची बतावणी करणाऱ्या भोंदूबाबाच्या विरोधात पुण्यातील बावधन येथे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.  प्रसाद दादा उर्फ दादा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदू बाबाचं नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक असलेल्या 39 वर्षीय व्यक्तीने बावधन पोलिस ठाण्यात भोंदूबाबाने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, भोंदू बाबांना त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याचा बनाव करत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. आरोपीने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीच्या मोबाइलमध्ये एक अॅप डाउनलोड करायला सांगितले होते. या अॅपच्या माध्यमातून त्याने त्याच्या मोबाइलचा अॅक्सेस मिळवला. मोबाईलवरील माहितीचा गैरवापर करत अश्लील कृत्य करण्यास तसेच मोबाईलवरील माहितीचा गैरवापर करत अश्लील कृत्य करण्यास तसेच वेश्यागमनास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे.

इतकंच नव्हे तर, फिर्यादीला प्रेयसीबरोबर अश्लील कृत्य त्याच बरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडले आणि मोबाईल ॲपद्वारे ते बाबाने पाहिल्याचं फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे. या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या बाबाने फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पोलीस अधिक तपास करत आहेत.

फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून, त्याच्यावर फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायदा, लैंगिक शोषणास प्रवृत्त करणे इत्यादी गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, बाबाने या सगळ्याच्या मोबदल्यात, मठाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याने फार्यादीकडून 15 हजार रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात घेताच फिर्यादीने थेट पोलिसांत धाव घेतली आहे.

Read More