Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करायचे, अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune News Today: बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा करायचे पाठलाग नंतर घरापर्यंत जात पैसे उकळायचे. पुणे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत

बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करायचे, अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune News Today: पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवार पेठेत वेश्यागमनसाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करत ऑनलाइन पैसे उकळायचे. या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुण्यातील नांदेड सिटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दोन आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. आयुष राजू चौगुले, सदफ पठाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करत त्यांच्या घरापर्यंत जात पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आला होता. दोन जणांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणातील आरोपी असणारे दोघे जण हे फिर्यादी बुधवार पेठेत गेले असता त्याचा पाठलाग करत त्याच्या घरापर्यंत आले आणि तुम्ही आमच्याकडून 20000 रुपये ऑनलाइन देतो म्हणून आमच्याकडे कॅश घेतल्याची बतावणी करत पैसे द्या अन्यथा आम्ही तुमची बदनामी करू अशी धमकी दिली होती.

आम्हाला पैसे द्या अन्यथा बुधवार पेठेत गेला होतात, अशी तुमची बदनामी करू असं फिर्यादीला धमकावले होते. आरोपींनी एवढ्यावरचथांबता पोलीस हेल्पलाइन 112 या नंबरवर कॉल केला आणि पोलिसांत तक्रार द्यायला सुरुवात केली की यांनी आमच्याकडून वीस हजार रुपये घेऊन आमची फसवणूक केली आहे. त्यानंतर नांदेड सिटी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की हे दोन आरोपी अशा पद्धतीनं फिर्यादीची फसवणूक करत आहेत त्यानंतर या दोन्ही आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यात भरदिवसा 50 लाखांची जबरी चोरी

पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात 50 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. थार गाडीतून आलेल्या दोघांनी भरदिवसा ही जबरी चोरी केली आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. धाराशिव येथील अभिजीत पवार आणि मंगेश ढोणे हे दोघे पुण्यात व्यवहारासाठी आले होते. बाबजी पेट्रोल पंपाजवळ पायी जात असताना, काळ्या रंगाच्या थार गाडीतून आलेल्या दोघांनी ढोणे यांच्या हातातील रोकड असलेली बॅग हिसकावून नवले पुलाच्या दिशेने पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची गुन्हे शाखा घटनास्थळी दाखल झाली असून, आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More