Pune Crime News: पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आता पुण्यात आमदाराचा भाऊ आणि त्याच्या मित्राने राडा घातला आहे. यांनी थिएटरवर गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रतयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात एक तकुणी जखमी झाली आहे.
पुण्यातील दौंड परिसरात ही घटना घडली. सत्ताधारी महायुतीतील एका आमदाराचा भाऊ आणि त्याच्या मित्रांनी राडा केल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी तमाशा थिएटरवर गोळीबार केला. आमदाराच्या भावाच्या मित्राने गोळीबार केल्याची माहिती डान्स करणारी तरुणी जखमी झाल्याची माहिती. यवत पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू आहे.दरम्यान, हा कोणत्या आमदाराचा भाऊ आहे? या आमदाराचे नाव काय? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोंढवा परिसरात कोयता गँगने एका टपरी चालकावर हल्ला करत टपरीची तोडफोड केली. एवढ्यावरच न थांबता या आरोपींनी गल्ल्यात हात घालून पैसे काढण्याचाही प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात चित्रित झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कोयता गँगवर पोलिस कारवाई कधी कारवाई करणार, असा सवाल स्थानिक विचारत आहेत.