Pune Crime News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. अशात पुण्यात आणखी एक हादरवणारी घटना घडली आहे. राजगुरुनगर जवळील चांडोली येथे अल्पवयीन तरुणी अत्याचार झाला आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाली आहे. NDRF चे पथक मागील 3 दिवसांपासून या तरुणीचा शोध घेत आहे.
राजगुरुनगर जवळील चांडोलीत अल्पवयीन तरुणी अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. मागील चार महिन्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची ही चौथी घटना आहे. सोबत आचारी काम करणाऱ्या नराधमाने या तरुणीवर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तरुणी तीन दिवसापासुन बेपत्ता झाली आहे. चांडोली येथील केदारेश्वर बंधाऱ्यावर या तरुणीची ओढणी, चप्पल आढळून आली आहे. पिडित तरुणीने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. NDRF च्या दोन टिमकडुन भिमानदीवरील केदारेश्वर बंधा-यावर तीन दिवसांपासुन शोध मोहिम सुरु आहे.
पीडित बहिणीच्या तक्रारीवरुन राजगुरुनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, पिडित तरुणीवरुन अत्याचार झाल्यानंतरही तीन दिवसांनंतर मिळुन न आल्याने कुटुंबियांची चिंता वाढली आहे.
पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वारजे परिसरातील निर्मनुष्य रस्त्यावर एका युवकाने युवतीला मारहाण केली आहे. वारजेतील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस उपायुक्त यांनी दिले चौकशीचे आदेश दिले आहेत. हे युवक व युवती कोण आहेत याबाबत पोलिसांना माहिती मिळू शकली नाही. व्हिडिओच्या आधारे तपास घेतला जात आहे.