Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यातील क्लास वन ऑफिसरचे धक्कादायक कृत्य; ऑफिसर असलेल्या पत्नीचा अंघोळीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि...

क्लास वन ऑफिसरने घरातच स्पाय कॅमेरे लावले.  अधिकारी असलेल्याच पत्नीच्या अंघोळीचा व्हिडिओ अधिकाऱ्याने रेकॉर्ड केले.  

पुण्यातील क्लास वन ऑफिसरचे धक्कादायक कृत्य; ऑफिसर असलेल्या पत्नीचा अंघोळीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि...

Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील क्लास वन ऑफिसरचे धक्कादायक कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत. या क्लास वन ऑफिसरने घरातच स्पाय कॅमेरे लावले होते.  अधिकारी असलेल्याच पत्नीच्या अंघोळीचा व्हिडिओ अधिकाऱ्याने रेकॉर्ड केले होते. हे व्हिडिओ रेकॉर्ज करण्यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे. 

क्लास वन ऑफिसर असलेल्या पतीने आपल्याच क्लास वन ऑफिसर असलेल्या पत्नीचे घरातच स्पाय कॅमेरे लावून अंघोळीचा व्हिडिओ रेकॉर्ड केले. याच व्हिडिओच्या मदतीने या अधिकाऱ्याने अधिकारी असलेल्या पत्नीला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माहेरून कार आणि कारच्या हप्त्याकरिता दीड लाख रुपये आणण्याची जबरदस्ती करण्यात केल्याचा आरोप पीडित अधिकारी महिलेने केला आहे. 

या प्रकरणी 30 वर्षीय क्लास वन ऑफिसर असलेल्या पत्नीने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे.  2020 मध्ये पीडितेचे लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांचा संसार सुखाचा सुरु होता. मात्र काही वर्षात पतीला पत्नीवर संशय आला. तिला त्रास द्यायला सुरुवात केली. वारंवार पैशासाठी त्रास देत होता. सोबतच नजर ठेवण्यासाठी स्पाय कॅमेरेदेखील घरात बसवून घेतले होते असा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. 

Read More