Pune Crime News : पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बॉयफ्रेंडच्या मदतीने स्वतःच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून आईनेच हे व्हिडिओ व्हायरल केले आबे. पोलिस तपासात आईने हे कृत्य का केले यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे. मुलीची बदनामी करुन ही आई फरार झाली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
फरार असलेल्या बंटी आणि बबलीला बिबेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आईचे आणि आईचा प्रियकर गुरुदेव स्वामी यांच्या रिलेशन बद्दल घरमालकिणीला माहिती दिली. त्या गोष्टीचा मनात राग धरून आईच्या प्रियकराने गुरुदेव स्वामी यांनी मुलीशी घरी कोणी नसताना छेडछाड करून जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीचे अश्लील व्हिडिओ काढले. ते व्हिडिओ मुलीच्या आईने नातेवाईकांना बहिणींना, वडिलांना पाठवून मुलीची बदनामी केली.
व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर प्रियकर आणि आई दोघेही फरार झाले. बिबेवाडी पोलिसांकडून फरार असलेल्या आई आणि प्रियकराला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
लातूर तालुक्यातील चाकूर येथील ड्रग्स प्रकरण ताजं असतानाच आता लातूर शहरातील एका स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला आहे. ''''औरा स्पा'''' सेंटरवर धडक कारवाई करत पोलिसांनी चार तरुणीची सुटका केले असून, स्पा मॅनेजरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुटलेल्या तरुणींचे मूळ दिल्ली, मुंबई आणि तेलंगणा राज्यांशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. अनेक दिवसांपासून स्पा सेंटरवर संशय घेतला जात होता. अखेर पोलिसांनी सापळा रचून हे सेक्स रॅकेट उघडकीस आणले. सध्या 6 आरोपी विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.