Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण, शिक्षणाच्या माहेरघरात धक्कादायक प्रकार

School Teacher Beaten: शिक्षणाचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय.

शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण, शिक्षणाच्या माहेरघरात धक्कादायक प्रकार

School Teacher Beaten: लहान विद्यार्थ्यांना शिक्षक किंवा केअरटेकरकडून मारहाण केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात समोर येतात. हे व्हिडीओ पाहणे खूपच संतापजनक असते. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित होतो.  शिक्षणाचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  

शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा गंभीर प्रकार पुण्यात घडलाय. पुण्याच्या नूमवि शाळेतून ही घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याला जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. या प्रकारानंतर पालकवर्गाकडून शिक्षिकेप्रती प्रचंड चीड आणि मुलांप्रती काळजी व्यक्त केली जात आहे. 

व्हिडीओमुळे ही गंभीर बाब समोर आली आहे. जयेश शिवाजी लोंढे असे विद्यार्थ्यांचे नाव असून त्याला शालेय शिक्षिकेने रागाच्या भरात खूप मारहाण केल्याचा ठपका ठेवण्यात आला. 

या गंभीर घटनेनंतर जयेश लोंढे या मारहाण झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांकडून पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. 
पूजा केदार या मराठी शिकविणाऱ्या शिक्षिकेने जयेश लोंढेला मारहाण केली आहे.

Read More