Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

VIDEO | लहान मुलांसोबत असं कधीच करू नका

 रस्त्यात काम करणाऱ्या जेसीबीनं खेळणाऱ्या मुलालाच उचलल्याचा प्रकार पुण्यात घडलाय.

VIDEO | लहान मुलांसोबत असं कधीच करू नका

पुणे : रस्त्यात काम करणाऱ्या जेसीबीनं खेळणाऱ्या मुलालाच उचलल्याचा प्रकार पुण्यात घडलाय. खेळणाऱ्या मुलांचा बॉल जेसीबी असलेल्या ठिकाणी गेल्यानं जेसीबी मालकानं हळूच तिथे येऊन खेळणाऱ्या सार्थक लिंबोणे, नावाच्या लहान मुलाला जेसीबीच्या बकेटमध्ये बसवून नागझरीच्या नाल्यात टाकण्य़ाचा प्रयत्न केला. तो मुलगा एवढा घाबरला होता की त्याने दोन दिवस घाबरून हा प्रकार घरात सांगितला नाही. त्या मुलाला काही दुखापत झाली असती तर, त्याची जबाबदारी मनपाने घेतली असती का? असा सवाल विचारला जात आहे. तर जेसीबी मालक आणि संबंधित व्यक्तीवर अद्याप कारवाई झालेली नाही. 

Read More