Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Pune Exam: 1 मिनिट उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना ठेवले केंद्राबाहेर, पुण्यात वनविभागाच्या परीक्षेतील प्रकार

Pune forest Department Exam: 1 हजार परीक्षा शुल्क भरणारे 35 लाख विद्यार्थ्यांनी आहेत. फक्त महाराष्ट्र मध्ये 7000 हजार जागा आहेत. त्यामधूनही असे  25 ते 30 विद्यार्थी बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली. 

Pune Exam: 1 मिनिट उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना ठेवले केंद्राबाहेर, पुण्यात वनविभागाच्या परीक्षेतील प्रकार

Pune forest Department Exam: महाराष्ट्र सरकारच्या वनविभाग परीक्षेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. अवघे 1 मिनिट उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा वर्गातून बाहेर ठेवण्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे रामटेकडी येथील सुयोग हब परीक्षा केंद्रावर 25 ते 30 विद्यार्थ्यांना उशीरा आल्याने बाहेर ठेवले असून या विद्यार्थ्यांची पुनरपरीक्षा घ्यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. 

आज रामटेकडी पुणे या ठिकाणी वन विभागाच्या पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा सुरु होती. एक मिनिट उशीर झाला म्हणून पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांना बाहेर काढले गेले. या विद्यार्थ्यांनी रडत रडत पुण्यातील मराठा क्रांती संघटनेशी संपर्क साधला. 

विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांकडून एक हजार रुपये परीक्षा शुल्क फी आकारले आहे. आणि या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी दोन वर्ष अभ्यास केला आहे. 1 हजार परीक्षा शुल्क भरणारे 35 लाख विद्यार्थ्यांनी आहेत. फक्त महाराष्ट्र मध्ये 7000 हजार जागा आहेत. त्यामधूनही असे  25 ते 30 विद्यार्थी बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली. 

दरम्यान या विद्यार्थ्यांसंदर्भात शासनाने  लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि  विद्यार्थ्यांचे नुकसान होण्यापासून थांबवावे अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र अशा पद्धतीने आंदोलन केले जाईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे धनाजी साखळकर यांनी दिला. 

 राज्यभरातील अनेक परीक्षा केंद्रांवर असा प्रकार घडला आहे. परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारला याबाबत निवेदन दिले जाणार आहे, असे साखळकर यांनी झी 24 तास शी बोलताना सांगितले.

Read More