Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

संतापजनक! रिक्षा भाडं न दिल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे

संतापजनक! रिक्षा भाडं न दिल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : रिक्षा भाडं देण्यासाठी पैसे नसल्याने 15 वर्षाच्या मुलीला जंगलात नेऊन बलात्कार केल्याची घटना धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना पुण्यात घडली.  या संबंधी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर विभीषण बचूटे, विकीकुमार फुलोपासवान आणि अशोक थापा अशी आरोपींची नावं आहेत. पीडित मुलगी आणि तिची मैत्रिण पुण्यातील बुधवार पेठ इथं रिक्षातून जात होत्या. पण त्यांच्याकडे पैसे नसल्याचं रिक्षाचालक सागर बचूटेच्या लक्षात आलं. याचा फायदा उचलत नराधम रिक्षाचालकाने रिक्षा रेसकोर्ससमोरील जंगलात नेली. आणि इथे पीडित मुलीवर बलात्कार केला.

याआधी काही दिवसांपूर्वीच पीडित मुलीच्या ओळखीतल्या विकी आणि अशोक या दोन रिक्षाचालकांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. या तीनही आरोपींनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read More