Vadgaon Sheri Assembly Constituency Jagdish Mulik ON Sunil Tingre: विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीतील धुसफूस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही धुसफूसमुळे घटक पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढलीय. पुण्यात महायुतीत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदारांमध्ये श्रेय वाद उफाळून आलाय. महायुतीत वडगाव शेरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर महायुतीत घटक पक्षामध्ये कलगीतुरा रंगल्याची पाहिली मिळत आहे.
वडगाव शेरीमधील विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या मतदार संघातील 300 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आज अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. त्याची जोरदार जाहिरातही टिंगरे यांनी सोशल मीडियावर केलीय. मात्र जाहिरातीवर आता माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आक्षेप घेतलाय. मतदार संघातील विकास कामांचा पाठपुरावा एकट्या आमदारांनी केलेला नाही. जाहिरातीवर शिंदे आणि फडणवीस यांचे फोटो नसल्यानं मुळीक यांनी नाराजी व्यक्त केलीय. तसंच मुळीक विधानसभेसाठी वडगाव शेरीतून इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे या जागेवरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा मध्यवर्ती इमारत, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय इमारत आणि जमावबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख इमारत या अशा तब्बल 306 कोटी 41 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. अजित पवार हे महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत अहिल्याभवन इमारतीच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी देखील करणार आहेत.
वडगाव शेरी मतदार संघात 306 कोटी 41 लाखांच्या विकास कामांचे भूमीपूजन
— Sunil Tingre (@suniltingre) August 25, 2024
आपल्या वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा मध्यवर्ती इमारत, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय इमारत आणि जमावबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख इमारत या अशा तब्बल ३०६ कोटी ४१ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री… pic.twitter.com/GyegXjWMIQ
जगदीश मुळीक म्हणाले,वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे ! अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली.
वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का?
— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) August 25, 2024
महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे !
वडगावशेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे, हे नागरिकांच्या… pic.twitter.com/CvcDhAkWXm
आगामी विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरीमध्ये पेच निर्माण होणार आहे. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना लोकसभेत संधी न मिळाल्यामुळे ते विधानसभेची अपेक्षा बाळगून आहेत. मात्र त्याच वेळी वडगाव शेरीमध्ये विद्यमान आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे ही जागा कुणाच्या वाट्याला जाते त्यावर आजी माजी आमदारांची भवितव्य अवलंबून आहे. तूर्तास तरी या प्रश्नावर तोडगा दृष्टीपथात नसल्याने दोघांमध्ये श्रेय वादाची ठिणगी पडली आहे.