Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धक्कादायक! पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी

पुण्यातल्या धक्कादायक प्रकाराने खळबळ, आरोपीने खंडणी म्हणून मागितले तब्बल 60 बिटकॉईन... पोलीस स्थानकात तक्रार दाखल  

धक्कादायक! पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिकाचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने ईमेलद्वारे (Email) तब्बल 60 बिटकॉईनची (Bitcoin) खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीने ईमेल पाठवला आहे त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivahi Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीत ब्रॅंड हेड म्हणून काम करणार्‍या महिला कर्माचाऱ्याने संबंधीत आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. हा प्रकार 29 नोव्हेंबर पासून सुरू आहे.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला धमकी
पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिकाचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एकाने ईमेलद्वारे तब्बल 60 बिटकॉईन म्हणजे तब्बल 8 कोटी 30 लाख 40 हजारांची खंडणी मागितली आहे. ज्या महिला कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली आहे त्या बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीत 2017 पासून बँड हेड म्हणून काम करतात. त्यांच्याकडे ईमेल तपासणे आणि ईमेल पाठविण्याचं काम आहे. 

29 तारखेला त्या त्यांचे काम करत असताना त्यांना एका ईमेल आयडीवरून तीन वेगवेगळ्या कंपनीसंबंधीत ईमेलवर मेल आढळून आले. त्यामध्ये ईमेल करणार्‍या आरोपीने कंपनीचे चेअरमन यांचे खासगी फोटो सोशल मीडियावर शेयर करण्याची तसंच कंपनीतील अधिकारी, माध्यम प्रतिनिधींसह इतरांना टॅग करून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली.  बदनामी टाळायची असल्यास 60 बिटकॉईनची मागणी केली.

हे ही वाचा : Shraddha Murder Case : 23 दिवस, शेकडो प्रश्न पण... पाहा आतापर्यंत पोलिसांच्या हाती काय लागलं

60 बिटकॉईनची सध्याच्या बाजारभावानुसार 8 कोटी 30 लाख 40 हजार रूपये किंमत आहे. तर एक बिटकॉइनची आजच्या बाजारभावानुसार किंमत ही 13 लाख 84 हजार 27 रूपये आहे.

Read More