Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Pune News : पुण्यात IT क्षेत्रातील नोकरदारांना मोठा दिलासा; प्रशासनाचा आराखडा एकदा पाहाच

Pune News : पुणे... देशात बंगळुरूमागोमागच आणखी एक आयटी हब अर्थात IT क्षेत्रातील अनेक कंपन्यांचं वर्तुळ अशी अळख असणारा आणखी एक मोठा परिसर... पुण्यातील याच आयटी हबसंदर्भातील महत्त्वाची माहिती...   

Pune News : पुण्यात IT क्षेत्रातील नोकरदारांना मोठा दिलासा; प्रशासनाचा आराखडा एकदा पाहाच

Pune News : मागील काही वर्षांमध्ये बंगळुरूप्रमाणंच पुण्यामध्येसुद्धा देशभरातून IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक तरुण वर्गानं मुक्काम ठोकला. पुण्याच्या हिंजवडी, खराडी, मगरपट्टा या आणि अशा इतर भागांमध्ये असणाऱ्या आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येनं पुणे आणि पुण्याबाहेरी मंडळी नोकरीसाठी रुजू असून, राज्याबाहेर अनेक नोकरदारही पुण्यासह पुण्यानजीकच्या भागात स्थायिक होताना दिसत आहेत. मात्र त्यांच्यापुढं असणाऱ्या अनेक समस्या आणि कंपन्यांपुढं असणाऱ्या काही अडचणी पाहता एकिकडे आयटी पार्कच्या स्थलांतराची चर्चा जोर धरत असतानाच दुसरीकडे पुणे प्रशासनानं त्यावर तोडगा काढण्याच्या हेतूनं पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे. (Pune Job News)

पुणे महानगरपालिकेचा मेगाप्लान? 

पुणे प्रशासनाच्या वतीनं पुणे मगानगर परिवहन महामंडळाच्या वतीनं प्रामुख्यानं (Pune IT Jobs) हिंजवडी, खराडी आणि आयटी पार्कच्या दिशेनं असणाऱ्या भागासाठी डबलडेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, पुण्यातील वाहतूक व्यवस्थेमध्ये केल्या जाणाऱ्या या प्रयोगाचा शुभारंभ या आयटी हबपासूनच केला जाणार आहे. 

पुणे आणि पिंपरी चिंचवडचा भाग पाहता तिथं हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, हडपसर यांसारख्या भागांमध्ये आयटी क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या बड्या संस्थांची कार्यालयं असून, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधांच्या अभावी या संस्थांना कैक अडचणींचा सामना करावा लागत होता. ज्यामुळं कंपन्यांनी येथून गाशा गुंडाळण्याची तयारी दाखवली असता तातडीनं या भागामध्ये पर्यायी उपाययोजनांवर प्रशासनानं काम सुरू केल्याचं पाहायला मिळालं.

हेसुद्धा वाचा : BDD वासियांना नव्या घराची चावी मिळण्याआधीच मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य; सप्टेंबर- डिसेंबरमध्ये..

वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा निघणार? 

पुण्यात, प्रामुख्यानं आयटी क्षेत्रातील कार्यालयांच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुशं कर्मचारी वर्गापुढं उभ्या राहणाऱ्या अडचणी पाहता, इथं डबल डेकर बससेवा सुरू केल्या जाणार आहेत. ज्याअंतर्गत एका खासगी कंपनीच्या पथकाकडून या भागांची पाहणी करत तिथं प्रायोगिक तत्त्वावर पुणे महानगर परिवहनच्या वतीनं डबल डेकर बस चालवण्यात येणार आहे. तेव्हा आता प्रशासनानं शोधलेल्या या पर्यायाचा आयटी कंपन्या, तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि मागोमाग पुणेकरांनाही नेमका कसा आणि किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

FAQ

पुणे महानगरपालिका डबल डेकर बससेवा का सुरू करत आहे?
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आयटी हब्स जसे की हिंजवडी, खराडी, मगरपट्टा आणि हडपसर येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि आयटी कर्मचाऱ्यांना प्रवासात सुविधा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) डबल डेकर बससेवा सुरू करत आहे.

ही बससेवा कोणत्या भागात चालवली जाणार आहे?
ही सेवा प्रामुख्याने आयटी हब्स असलेल्या हिंजवडी, खराडी, मगरपट्टा आणि हडपसर या भागांमध्ये चालवली जाणार आहे, जिथे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे.

डबल डेकर बससेवा कधी सुरू होणार आहे?
ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर लवकरच सुरू होणार आहे. यासाठी एका खासगी कंपनीच्या पथकाकडून येत्या आठवड्यात पाहणी केली जाईल आणि त्यानंतर बससेवेचा शुभारंभ होईल.

Read More