Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मध्यरात्री दुचाकीवरुन पत्नीचा मृतदेह घेऊन शहरात फिरत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या माथेफिरु आरोपीला अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री साधारणे 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. राकेश रामनायक निसार असं आरोपीचे नाव असून त्याने पत्नी बबिता राकेश निसार हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो चक्क दुचाकीवरुन तिचा मृतदेह घेऊन प्रवास करत होता. नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.
भूमकर पुलाकडून राकेश बायकोचा मृतदेह घेवून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता. दुचाकीवरुन मृतदेह घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला आडवले. त्यानंतर त्याचे बिंग फुटले. आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसानी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. राकेशने पत्नीची हत्या का केली, याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून राजेशची चौकशी केली आहे. त्याचबरोबर मोबाइल कॉल रेकॉर्ड आणि घरगुती संबंध याबाबींचाही तपास केला जात आहे. मात्र, पत्नीची हत्या करुन मृतदेह सार्वजनिक ठिकाणी नेण्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नवा व्यापार ऑफलाईन गेम खेळताना दोन मित्रांमध्ये भांडण झालं. त्यानंतर जाब विचारायला गेलेल्या अल्पवयीन भावाचा यात नाहक बळी गेला. पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी 19 सोहेब शेखला अटक करण्यात आलीये. 16 वर्षीय गणेश कुऱ्हाडेचा भाऊ कार्तिक आणि सोहेब हे एका मित्राच्या टेरेसवर खेळत होते. कॅरम खेळून झाल्यावर त्यांनी नवा व्यापार खेळायला सुरुवात केली. मात्र खेळता-खेळता वादाला तोंड फुटले, मग सोहेबने कार्तिकला मारहाण केली. त्यानंतर खेळ अर्धवट सोडून सगळे आपापल्या घरी परतले. कार्तिकने घरी येताच मोठा भाऊ गणेशला याबाबत सांगितले. गणेशने सोहेबकडे जात त्याला जाब विचारला. लहान असताना जाब कसा काय विचारला? या रागातून सोहेबने गणेशच्या पायात-पाय टाकून त्याला सिमेंटच्या रस्त्यावर जमिनीवर पाडले अन लाथांनी मारहाण ही केले. या घटनेत गणेशच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला तातडीनं रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न ही झाले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. गणेशचा मृत्यू झाला होता.