Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यात तरुणाला श्रीमंतीचा माज, रस्त्याच्या मधोमध BMW थांबवली, लघुशंका अन् अश्लील चाळे; संतापजनक Video

Pune Crime News: पुण्यात तरुणाला श्रीमंतीचा माज भर रस्त्यात मद्यधुंद तरुणाचे विकृत चाळे करत असल्याचे समोर आले आहे. रस्त्यात गाडी उभी करुन दुभाजकावर लघुशंका करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.   

पुण्यात तरुणाला श्रीमंतीचा माज, रस्त्याच्या मधोमध BMW थांबवली, लघुशंका अन् अश्लील चाळे; संतापजनक Video

Pune Crime News: सुसंस्कृत पुण्यात नक्की झालंय तरी काय? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहेत. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून गेल्या काही दिवसांतून धक्कादायक घटना समोर येत आहेत. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण भरदिवसा रस्त्यावरील दुभाजकावर लघुशंका करत अश्लील चाळे करत असल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

एका श्रीमंत घरातील तरुणानं भर रस्त्यात आलिशान गाडी उभी करुन रस्त्यावरील दुभाजकावर लघुशंका केलीये.. दारुच्या नशेत हा तरुण भर रस्त्यात अश्लिल चाळेही करत होता.. सकाळच्या सुमारास पुण्यातील येरवडा भागातल्या शास्त्रीनगर चौकात हा प्रकार घडला आहे. गंभीर बाब म्हणये यावेळी रस्त्यावरु महिलाही प्रवास करत होत्या. मात्र महिलांसमोरच या मद्यधुंद तरुणाचे अश्लिल चाळे सुरु होते. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

या विकृतीला कडक शासन करायला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी शक्ती कायदा संदर्भात मसुदा केला आहे. केंद्रातील काही कायदे बदल झाला आहे. त्यामुळे फेरसादर केला जाईल. तसेच पाऊल नवीन कायद्यात उचलले जातील. महिलांवर होणाऱ्या घटना आहेत त्याला चाप बसेल, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.  

पुण्यातील दुसरी घटना

पुण्यातल्या कोथरुड भागात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. क्षुल्लक कारणावरुन एका रिक्षाचालकानं साथिदारांच्या मदतीनं या तरुणाला मारलंय.

पुण्यातली दहशतीची तिसरी घटना घडली ती पुण्यातील मोमिनपुरा भागातील. एका विक्रेत्याला टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. नेमकी ही मारहाण कशामुळे झाली हे समजू शकलेलं नाही.   

पुण्यातील चौथी घटना 

किरकोळ कारणावरून ऑफिस वरून घरी निघालेल्या पती-पत्नीवर आज्ञात टवळखोरांनी कोयत्याने वार केले आहेत. ऑफिस संपल्यानंतर घराकडे निघाले असता सिंहगड कॉलेज पोलीस चौकीच्या हद्दीतील क्षेत्रीय कार्याजवळ ही घटना घडली आहे. या मारहाणीमध्ये तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्या दोन्ही दांपत्याला सिल्वर ब्रिच हॉस्पिटल नरे येथे दाखल केले आहे. अद्याप आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाहीये 

Read More