Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'अत्याचाराचा सीसीटीव्ही...'; स्वारगेट बस स्थानकात नेमकं काय घडलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

Pune News Today: एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये प्रवासी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे. 

'अत्याचाराचा सीसीटीव्ही...'; स्वारगेट बस स्थानकात नेमकं काय घडलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

Pune Shivshahi Bus Raped Latest Update: पुण्यातील स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. वर्दळीच्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी हा जामिनीवर सुटलेला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय घडलं आणि तपासाची दिशा काय आहे? याची उत्तरे दिली आहेत. 

' पीडित तरुणी ही पुण्यात कामाला आहे. ती फलटणला गावाला जात होती. गावी जाण्यासाठी जिथे बस सुटतात तिथे ती बसली होती. तेव्हा आरोपी तिच्या आजूबाजूला घुटमळत असल्याचे सीसीटिव्हीत दिसत आहे. काही वेळाने आरोपी तिच्या बाजूला येऊन बसला आणि तिची विचारपूस करु लागला. आरोपीने तिला कुठं जायचं असं विचारलं. तेव्हा तिने फलटणला जातेय, असं सांगितलं. तेव्हा त्याने सातारला जाणारी बस येथे लागत नाही असं सांगून तिला दुसरीकडे नेले, अशी माहिती पुणे पोलिस डिसीपी स्मार्थना पाटील यांनी दिली आहे. स्वारगेट अत्याचाराचा सीसीटिव्ही पोलिसांच्या हाती लागला असून त्यावरुन आरोपीची निश्चिती करण्यात आली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

'पीडित तरुणीनेदेखील त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत गेली. मात्र त्याने दाखवलेल्या बसमध्ये आंधार पाहून तिने प्रश्न उपस्थित केला. तेव्हा त्याने ही रात्रीची बस असून आतमध्ये प्रवासी झोपलेले आहेत त्यामुळं अंधार आहे. असं सांगून तिला विश्वास दिला. त्यानंतर ती बसमध्ये गेली तेव्हा त्याने तिला आत ढकलून बसचा दरवाजा बंद केला आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला आहे,' असंही त्यांनी सांगितलं. 

'अतिप्रसंगाची घटना घडल्यानंतर पीडित तरुणी तिच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये जावून बसली. तेव्हा रस्त्यात असताना तिने तिच्या मित्राला या घटनेबद्दल सांगितले. तेव्हा त्याने तिला पोलिसांत तक्रार दाखल कर, असा सल्ला दिला तेव्हा तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आम्ही आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपी जामिनावर सुटलेला असून शिरूर गावातील रहिवाशी आहे. सीसीटीव्हीत आरोपी दिसत असून आरोपीला शोधण्यासाठी 8 टिम शोधत आहेत', असंही त्यांनी म्हटलं आहे. 

Read More