Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भाड्याच्या वादातून पुण्यात रिक्षाचालकाकडून प्रवाशाची हत्या

पुण्यातील धक्कादायक प्रकार

भाड्याच्या वादातून पुण्यात रिक्षाचालकाकडून प्रवाशाची हत्या

पुणे : रिक्षाचं भाडं देण्यावरून झालेल्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना पुण्यात घडलीय. याप्रकरणी रिक्षाचालकासह साथीदाराला अटक करण्यात आलीय. सीसीटीव्ही फुटेजवरून हा गुन्हा उघडकीस आलाय. गणेश पेठेत शनिवारी दुपारी ही घटना घडली होती. तानाजी कोरके असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तानाजी कोरकेचा अतुल हराळे या रिक्षाचालकाशी वाद झाला होता. त्यातून रिक्षाचालक अतुल आणि त्याचा साथीदार रोहन गोडसे यांनी तानाजीला मारहाण केली. त्यात तानाजी जखमी झाल्यानंतर आरोपींनी त्यांला ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचारादरम्यान तानाजीचा मृत्यू झाला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला. सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपींची ओळख पटल्यांनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. 

Read More