Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यात आता पोलिसांनाही काढावे लागणार बसचे तिकीट; परिवहन खात्याचा मोठा निर्णय

पुणे पोलिसांना(Pune police ) पुणे परिवहन अर्थात पीएमपीएलच्या बसमध्ये(PMPL bus  ) तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे.

पुण्यात आता पोलिसांनाही काढावे लागणार बसचे तिकीट; परिवहन खात्याचा मोठा निर्णय

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात आता आता पोलिसांनाही बसचे तिकीट काढावे लागणार आहे. पुणे पोलिसांना(Pune police ) पुणे परिवहन अर्थात पीएमपीएलच्या बसमध्ये(PMPL bus  ) तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे. पुण्यात पुन्हा एकदा महापालिका विरूद्ध पोलीस आयुक्त असा संघर्ष पेटल्याचे दिसत  आहे. तिकीट काढण्यावरुन हा वाद पेटला आहे. 

पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचा-यांना आता पुणे महापालिकेच्या PMPL बसमध्ये मोफत प्रवास करता येणार नाही.  पुणे आणि पिंपरी या 2 शहरांतील पोलिसांची PMPL बसेसमधून विनाटिकीट प्रवास सुविधा आजपासून बंद करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी हे आदेश काढले आहेत. 

राज्य सरकारने 1991 मध्ये पोलीस कर्मचा-यांना बसमधून विनातिकीट प्रवासाची परवानगी दिली होती. 31 वर्षानंतर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये ही सेवा आता बंद करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तलयाने या निर्णयाला विरोध दर्शवल्याची माहिती समोर येत आहे. 

 

Read More