Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सुट्ट्यांचा प्लॅन बोंबलला! पुण्यातून सर्वाधिक गर्दीची ट्रेन 12 दिवस बंद; रिझर्व्हेशन असलेल्यांनाही फटका

Pune Railway News: ज्यांनी उन्हाळी सुट्टीत बाहेर जाण्याचं नियोजन केलं असेल त्यांना मोठा फटका बसणार असून रेल्वेनंही एक खास आवाहन केलं आहे.

सुट्ट्यांचा प्लॅन बोंबलला! पुण्यातून सर्वाधिक गर्दीची ट्रेन 12 दिवस बंद; रिझर्व्हेशन असलेल्यांनाही फटका

Pune Railway News: ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भटकंतीचं नियोजन असलेल्या आणि त्यासाठी रेल्वे प्रवासावर अवलंबून असलेल्या पुणेकरांची चिंता वाढवणारी एक बातमी आहे. पुण्यातून सर्वाधिक गर्दी असलेली पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, हावडा-पुणे दुरंतो एक्सप्रेस आणि पुणे-संत्रागाची पुणे एक्सप्रेस या रेल्वे गाड्या पुढील काही दिवस बंद राहणार आहे. यापैकी एकही गाडी पुढील दोन आठवडे धावणार नाही. यासंदर्भातील माहिती रेल्वेनेच दिली आहे.

'या' ट्रेनला बसणार सर्वाधिक फटका

पुणे-हावडा मार्गावरील बिलासपूर विभागात कनेक्टिव्हिटीच्या कामामुळे काही दिवस या मार्गावरील पुण्याकडे ये-जा करणाऱ्या ट्रेन बंद राहणार आहेत. या कामाचा सर्वाधिक फटका 'आझाद हिंद एक्सप्रेस'ला बसणार आहे. त्यामुळे अगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

कधी बंद राहणार या मार्गावरील वाहतूक?

उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असून रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. असं असतानाच रेल्वेकडून बिलासपूर विभागातील रायगड-झारसुगुंडा जंक्शनमध्ये कोटारलिया  स्थानकावरील चौथ्या मार्गावरी कनेक्टिव्हिटीचे काम सुरू करण्यात येणार आहे. 11 एप्रिल ते 23 एप्रिल या 12 दिवसांदरम्यान रेल्वेचं सदर काम चालू राहणार आहे. हे काम ऐन उन्हाळ्यात आणि प्रवासी हंगामा सुरू असताना करण्यात येत आहे. त्यामुळेच त्याचा परिणाम काही रेल्वे गाड्यावर झाला असला तरी त्यामुळे अनेक प्रवाशांना फटका बसणार आहे.

रेल्वे प्रशासनाने केलं आवाहन

या कामामुळे पुण्यातून या मार्गावर जाणाऱ्या आणि पुण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या वेळामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

रेल्वे गाड्या आणि रद्द करण्यात आलेली तारीख

संत्रागाची-पुणे एक्सप्रेस  12 आणि 19 एप्रिल रद्द

पुणे-संत्रागाची एक्सप्रेस 14 आणि 21 एप्रिल रद्द

पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस 11 ते 24 एप्रिल रद्द

हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस 11 ते 24 एप्रिल रद्द

हावडा-पुणे दुरांतो एक्सप्रेस  10,12,17 व 19 एप्रिल रद्द

पुणे-हावडा दुरांतो एक्सप्रेस  12 14 19 व 21 एप्रिल रद्द

Read More