Pune Rain : पुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातच आता याचा फटका आता कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील बसला आहे. दौंड तालुक्यातील हातवळण मध्ये वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे पोल्ट्री शेड जमीनदोस्त झाले आहे. शेडच्या भिंती आणि पत्रे पडल्याने 18 हजार कोंबड्या मेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्याचे 80 ते 85 लाखांचं मोठं नुकसान झाले आहे.
दौंड तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दौंड तालुक्यातील हातवळण गावातील शुभम गोगावले यांचे वादळी वाऱ्याच्या पावसाने पोल्ट्री शेडचे पत्रे आणि भिंती कोसळल्या. यामुळे पोल्ट्री शेड मधील 18000 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे 80 ते 85 लाखांचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी तसेच तलाठी दाखल होऊन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दौंड तालुक्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा पावसाला जोर धरल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
मावळच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे कांदे, ज्वारी, आंबे आणि पालेभाज्यांचं मोठं नुकसान झालेय.. शेतक-या हाता तोंडाशी आलेला घास निर्सगाने हिरावून घेतलाय.. त्यामुळे प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतक-यांनी केली.
सह्याद्री अतिथीगृहात दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु झाली. मुंबईसह महाराष्ट्रात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे राज्यभरात झालेल्या नुकसानीवर या बैठकीत चर्चा होऊ शकते. तसंच अतिवृष्टीमुळे शेतीलाही मोठा फटका बसलाय. याबाबतही अजून मदत जाहीर झालेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मदतीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तर मुंबई पुण्यासह इतरही भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
निफाड, लासलगाव आणि येवला तालुक्यांना पावसाचा फटका बसलाय. शेकडो एकर कांदा शेतातच भिजलाय. त्यामुळे कांदा उत्पादकांचं लाखो रुपयाचं नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय. पावसात तब्बल दीडशे क्विंटल कांदा भिजलाय. यात शेतक-याचं 3 लाखांहून अधिक आर्थिक नुकसान झालंय.