Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आयसीयुमधील रुग्णाला उंदरांचा चावा? ससून रुग्णालयात तरुणाच्या मृत्यूने खळबळ

Sassoon Hospital in Pune : पुण्यात ससून रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. रुग्णालायत उंदिरांनी चावा घेतल्याने आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. 

आयसीयुमधील रुग्णाला उंदरांचा चावा?  ससून रुग्णालयात तरुणाच्या मृत्यूने खळबळ

Pune : पुण्यातील ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) आयसीयुमध्ये एका 30 वर्षांच्या तरुणाला दाखल करण्यात आलं होतं. पण अचानक त्या तरुणाची प्रकृती खालावली आणि यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. आयसीयुमध्ये उंदराने चावा (Rat Bite) घेतल्याने मृत्यू झाल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. सागर रेणूसे असं या मृत तरुणाचं नाव असून भोर तालुक्यात त्याचा अपघात झाला होता. त्यानंतर त्याला 16 मार्चला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला आयसीयुमध्ये (ICU) हलवण्यात आलं. 

पण 26 मार्चाला त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतल्याने सागर प्रकृती खालावली आणि यातच त्याचा मृत्यू झाल्या आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकणाची चौकशी करण्यात येईल असं ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांनी सांगितलं आहे. 

सागर रेणूसे हा तरुण दारुच्या नशेत पुलावरुन खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला होता. 17 मार्चपासून सागरवर उपचार करण्यात येत होते. 29 तारखेपासून या रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यातच त्याचा मृत्यु झाल्याचं ससुनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांनी म्हटलय. या रुग्णाला खरच उंदीर चावला होता का याचा तपास केला जाईल असही डीनने स्पष्ट केलं आहे. 

Read More