Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यातून जुनी वाहने खरेदी-विक्री करताय? मग आधी जाणून घ्या RTOचा मोठा निर्णय

Pune RTO News: पुण्यात जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीत होणारी फसवणूक रोखण्यासाठी पुणे आरटीओ एक निर्णय घेतला आहे.   

पुण्यातून जुनी वाहने खरेदी-विक्री करताय? मग आधी जाणून घ्या RTOचा मोठा निर्णय

Pune RTO Important News: पुण्यात रोजच्या वापरासाठी जास्तीतजास्त गाड्या वापरल्या जातात. सार्वजनिक वाहनांपेक्षा पर्सनल गाडी तिकडे जास्त वापरल्या जातात. यामुळे पुण्यात वाहनांचे व्यवहार दर वर्षी मोठ्या प्रमाणात होत असतात. या खरेदी-विक्रीमध्ये अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडतात. नागरिकांनी आपल्या वाहनाची विक्री डीलर्सकडून केली तरी अनेक महिने त्या वाहनाची नोंदणी संबंधित आधीच्याच नागरिकांच्याच नावे राहते. यामुळे अशा वाहनांचा बेकायदा कामांसाठी वापर केला जात असल्याचे लक्षात आले. यामुळेच पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) जुन्या वाहन खरेदी व विक्री करणाऱ्या डीलरना अधिकृत परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे शहरात जुनी वाहने खरेदी-विक्रीचे मोठे 'मार्केट' आहे. छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे असे या विक्रीचे डीलर्स आहेत. एवढंच नाही तर बाहेरच्या राज्यातूनही अनेक लोक अशी वाहने खरेदीसाठी येतात. जुनीच वाहने असूनही या वाहनांची खरेदी-विक्री लाखो रुपयात होते. पण यामध्ये अनेक फसवणुकीचे प्रकार घडत असल्याचे लक्षात आले. 

नक्की कशी फसवणूक होते?

ज्यांना जुनी गाडी विकायची किंवा खरेदी करायची आहे ते गाडी डीलरकडे देतात. पण सगळी प्रोसेस झाल्यावरही वाहन लगेचच ग्राहकाच्या नावे करण्यात येत नाही. दुसरीकडे, त्या डीलरकडून ते वाहन कोणी खरेदी केले, तर त्या खरेदीदाराच्या नावावर ते वाहन केले जाते. यामध्ये अनेकदा वेळ जातो आणि दरम्यानच्या काळात त्या वाहनाचा गैरवापर होण्याचे प्रकार घडले आहेत.  त्यामुळे केंद्र सरकारने जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना परवाना देण्याचा धोरण तयार केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती.

आता कोणाची नावे वाहन होणार?

जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना अधिकृत परवाना देण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे. आता 'आरटीओ'कडे अर्ज केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून या वाहन खरेदी-विक्रीचा अधिकृत परवाना देण्यात येणार आहे. जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करणाऱ्या डिलर्सला  पुणे 'आरटीओ'कडे '२९ अ'नुसार अर्ज केल्यानंतर 'आरटीओ'कडून अधिकृत विक्रीचे प्रमाणपत्र दिले जाईल. 

Read More