Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुणे- टॅक्सीत तरुणीसमोर ड्रायव्हरचं हस्तमैथून: सरनाईक म्हणाले, 'धावत्या गाडीतून उडी...'

Pune Crime News: पुण्यामधील कल्याणीनगर येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेबद्दल सरनाईक यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.

पुणे- टॅक्सीत तरुणीसमोर ड्रायव्हरचं हस्तमैथून: सरनाईक म्हणाले, 'धावत्या गाडीतून उडी...'

Pune Crime News: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरने तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणासंदर्भात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया नोंदवील आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला असता सरनाईक यांनी नेमका घटनाक्रम पत्रकारांना सांगितला. 

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगरमध्ये 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:30 वाजता सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा विनयभंग करण्यात आला. येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या पीडित तरुणीने मोबाईल अॅपवरुन कॅब बुक केली. तरुणीला या कॅब चालकाने संगमवाडी रोडवरुन पिकअप केलं. कॅबने वेग पकडल्यानंतर मागील सीटवर बसलेल्या या तरुणीला ड्रायव्हर रियर व्ह्यू मिररमधून आपल्याकडे पाहत असल्याचं दिसलं. मात्र त्यानंतर रियर व्ह्यू मिररमधून या पीडित महिलेकडे पाहत ड्रायव्हरने हस्तमैथून करण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या या तरुणीने आधी आरडाओरड करुन लगेच कार थांबवण्यास सांगितलं. या तरुणीने गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने चालकाने कॅब थांबवली. महामार्गावर कॅब थांबवून या तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली.

सरनाईक काय म्हणाले?

सरनाईक यांनी आज राज्य परिवहन महामंडळच्या डेपोच्या सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी चर्चा केली. त्यावेळी पत्रकारांनी स्वारगेट प्रकरणाबरोबरच कॅब प्रकरणावरुन प्रश्न विचारला. त्यावर सरनाईक यांनी नेमकं या तरुणीसोबत काय घडलं याची माहिती दिली. "मुलगी एक किलोमीटर चालत गेली आणि तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. ती वारंवार कॅब चालकाला सांगत होती की गाडी थांबव. पण त्याने गाडी थांबवली नाही. तो गाडी थांबवत नसताना तिने धावत्या गाडीतून उडी मारण्याची धमकी दिल्यानंतर त्याने हायवेला रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. मुलीने गाडीखाली उतरल्यानंतर लगेच जाऊन तक्रार केली. अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नये म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील राहील," असं सरनाईक म्हणाले.

आरोपीला अटक

सदर प्रकरणात रविवारी खडकी पोलिसांनी 20 वर्षीय आरोपी कॅब ड्रायव्हरला अटक केली आहे. खडकी पोलिसांचे निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील आहे. आरोपी नुकताच मुंबईतून पिंपरी-चिंचवडला कामासाठी आला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Read More