Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यात चाललंय काय? धावत्या कॅबमध्ये तरुणीसमोरच हस्तमैथून करु लागला 20 वर्षीय चालक; तिने...

Pune Shocking Crime News 26 Year Old Molested: पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच ही बातमी समोर आली आहे.

पुण्यात चाललंय काय? धावत्या कॅबमध्ये तरुणीसमोरच हस्तमैथून करु लागला 20 वर्षीय चालक; तिने...

Pune Shocking Crime News 26 Year Old Molested: पुण्यामध्ये मंगळवारी (25 फेब्रुवारी 2025 रोजी) पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट बस डेपोतील 'शिवशाही' बसमध्ये 26 तरुणीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला असतानाच पुण्यातूनच अजून एक हादरवून सोडणारी बातमी पुढे आली आहे. कल्याणीनगर परिसरात एका 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीबरोबर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड करुन रस्त्यातमध्येच कॅब थांबवण्यास भाग पाडून थेट पोलीस स्टेशन गाठलं.

सॉफ्टवेअर इंजिनिअरबरोबर घडला हा प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगरमधील हा धक्कादायक प्रकार 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:30 वाजता घडला. कल्याणीनगरमधील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या तरुणीने मोबाईल अॅपवरुन कॅब बुक केली. या महिलेला पिकअप करण्यासाठी संगमवाडी रोडवर कॅब आली. ओटीपी वगैरेसारखे डिटेल्स देऊन प्रवास सुरु झाला.

करत होता हस्तमैथून

कॅबने वेग पकडल्यानंतर मागील सीटवर बसलेल्या या महिलेला ड्रायव्हर कार चालवताना काहीतरी करत असल्यासारखं वाटलं. तिने निरखून पाहिलं असता गाडी चालवत असताना, आरोपी तरुण ड्रायव्हर रियर व्ह्यू मिररमधून आपल्याकडे पाहत असल्याचं दिसलं. मात्र पुढील प्रकाराने या महिलेला धक्काच बसला. रियर व्ह्यू मिररमधून या पीडित महिलेकडे पाहून ड्रायव्हरने हस्तमैथून करण्यास सुरुवात केली. यामुळे भयभीत झालेल्या तरुणीने आधी आरडाओरड करुन लगेच कार थांबवण्यास सांगितलं. या तरुणीने गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने चालकाने कॅब थांबवली. महामार्गावर कॅब थांबवून या तरुणीने थेट पोलिस स्टेशन गाठले.

आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा

रविवारी खडकी पोलिसांनी 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक केली आहे. खडकी पोलिसांचे निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील आहे. आरोपी नुकताच मुंबईतून पिंपरी-चिंचवडला कामासाठी आला होता. पोलिसांनी या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीने यापूर्वीही असे काही प्रकार केले आहेत का याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र स्वारगेट पाठोपाठ आता हा प्रकार समोर आल्याने पुण्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु झाली आहे. 

स्वारगेट प्रकरणाची चौकशी कुठपर्यंत?

स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेवर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. दत्ता गाडेवर शिरूर, शिक्रापूर, अहिल्यानगर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडण्याचे गुन्हे त्यावर दाखल आहेत. 2021 मध्ये कर्ज काढून घेतलेल्या एका चारचाकीने तो पुणे-अहिल्यानगर मार्गावर प्रवासी वाहतूक करत होता. यावेळी त्याने अनेक महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटलं आहे. दत्ता गाडेच्या घरची परिस्थिती बेताची असून घरी आई-वडील, पत्नी, 2 मुले आणि एक भाऊ असा परिवार आहे. पुणे पोलिसांनी स्वारगेट प्रकरणात दत्तात्रय गाडेचा भाऊ, पत्नी आणि आई यांचा जबाब नोंदवला आहे.

Read More