Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा साखर संघावर धडक मोर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा साखर संघावर धडक मोर्चा

पुणे : पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या कैफीयत मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अलका टॉकीजच्या चौकातून साखर संकुलवर हा मोर्चा काढण्यात आला. ऊसाची थकीत एफआरपी मिळावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांची कैफीयत सरकारने ऐकली नाही तर फडणवीस आणि मोदी सरकारला बळी राजा धडा शिकवेल. असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आहे.

Read More