Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Swarget Rape Case: यापूर्वीही लिफ्टच्या बहाण्याने महिलांना...; आरोपी दत्ता गाडेचा Crime Record

Swarget Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.  

Swarget Rape Case: यापूर्वीही लिफ्टच्या बहाण्याने महिलांना...; आरोपी दत्ता गाडेचा Crime Record

Swarget Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून त्याचे राजकीय पडसाददेखील उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपी फरार असून त्याचा शोधासाठी पुणे पोलिसांकडून 13 पथके रवाना झाली आहे. अशातच आरोपीबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपी दत्ता गाडे हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. 

स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत आरोपी असल्याचे काही पुरावे तपासादरम्यान समोर आले आहेत. तर काही राजकीय व्यक्ती आणि पोलिसांच्या ही संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा एसटी स्थानकांवर सतत रेंगाळत असायचा. तर तेथील मुली, तरुणींना पोलीस असल्याचे भासवून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीवर शिरूर आणि शिक्रापूर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल आहेत. 

आरोपी दत्ता गाडे हा एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा तो कार्यकर्ता असल्याचेही समोर आले झाले असून त्याच्या संपर्कात राजकीय व्यक्ती, पोलिस कर्मचारीही असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. त्याने बलात्काराच्या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलिस असल्याचे भासवायचा. त्याच्या संपर्कात आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्याच्यावर या अगोदरच जबरी चोरीचे गुन्हे हे शिरूर आणि शिक्रापूर पोलिस स्टेशन मध्ये असल्याने त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे.फरार दत्ता गाडे आरोपीचा शोध सध्या शिरूर आणि पुणे पोलिस करीत आहेत. 

आई-वडिलांचा जबाब नोंदवला

आरोपी दत्ता गाडे याच्यावर ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडण्याचे गुन्हे त्यावर दाखल आहेत. 2021 मध्ये कर्ज काढून घेतलेल्या एका चारचाकीने तो पुणे अहिल्यानगर मार्गावर प्रवासी वाहतूक करत होता. यावेळी त्याने अनेक महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटलं आहे. दत्ता गाडे याच्या घरची परिस्थिती बेताची असून त्याला आई वडील, पत्नी, 2 मुले आणि एक भाऊ आहे. पोलिसांनी भाऊ, पत्नी आणि आई यांचा जबाब नोंदवला आहे.

आरोपीच्या शोधासाठी 13 पथके

आरोपीच्या शोधात पुणे पोलिसांचे 13 पथके रवाना करण्यात आली आहेत. त्यात विशेष शाखेचे 6 पथके आहेत. तर तरुणीवर अत्याचार करण्यात आलेली बस तपासणीसाठी नेण्यात आली आहे. बसमधील पुरावे आणि हाताचे ठसे फॉरेन्सिक तपासणीसाठी घेण्यात आली आहे

Read More