Pune Swargate Rape: पुण्याच्या स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आरोपीला अटक झाल्यानंतर या प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु असता आरोपी ज्या गावचे आहे त्या गुनाट गावचे ग्रामस्थ खूपच संतापले आहेत. गुनाट गावच्या ग्रामस्थांनी एका लाखाचे बक्षिस नाकारले आहे.
26 फेब्रुवारी रोजी पुण्याच्या स्वारगेट बस डेपो मध्ये तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला. या प्ररकरमातील आरोपी दत्ता गाडे हा पुण्यात दुष्कृत्य करून आपल्या गुनाट गावात येऊन लपून बसला होता. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 1 लाखाचे बक्षिस जाहिर करत तब्बल 72 तास गावात ड्रोन डॉगस्कॉड तसेच 13 विविध पथकांच्या तुकड्यांनी शोध घेतला अखेर गुनाट गावच्या ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांना दत्ता गाडेला पकडण्यात यश आले. आरोपी दत्ता गाडे पोलिसाच्या ताब्यात आहे. तर, दुसरीकडे गुनाट गावचे ग्रामस्थ आरोपीमुळे संतापले आहेत.
गुनाट गावात आरोपीच्या शोधासाठी ठेवण्यात आलेल्या लाखाच्या बक्षीसा वरून वाद श्रेयवाद सुरू असल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या जात असून गावात कुठलाही वाद नाही. मुळात आम्हाला एक लाखाचे बक्षीसच नको पण आमच्या गावची बदनामी आता तरी थांबवा अशा शब्दात ग्रामस्थ आक्रमक झालेत.
दरम्यान, स्वारगेट एस टी स्टँड लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित तरुणीचं चारित्र्यहनन रोखण्याची मागणी. वकील असीम सरोदे यांनी पुणे जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे ..पीडित तरुणीची विविध माध्यमांतून होत असलेली बदनामी रोखण्यासाठी न्यायालयाकडून मनाई आदेश देण्यासाठी सरोदे यांनी अर्ज दिला आहे यावर उद्या अकरा वाजता अर्जावर सुनावणी होणार आहे..