Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भरधाव होंडासिटीने तिघांना उडवल, दोघांचा जागीच मृत्यू

कारचं नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला तिघांना उडवलं.

 भरधाव होंडासिटीने तिघांना उडवल, दोघांचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यात नगर रस्त्यावर भरधाव होंडासिटी कारचं नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला तिघांना उडवलं. या अपघातात आजी आणि आणि मुलाचा अपघात झालाय.  यात या दोघांचाही जागीच मृत्यू झालाय. हा अपघात झाल्यानंतर चालक पळून गेल्याचा प्रकार घडलायं. पोलीस याप्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

चालक फरार 

शांताबाई सोनवणे आणि नयन रमेश मोकळे अशी त्यांची नावं आहेत. या अपघातात महेंद्र लोखंडे हे जखमी झालेत. नगर रोडवर एका हॉटेलसमोर हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण अपघात एवढा गंभीर होता की यातील एकजणच वाचू शकला. या अपघातानंतर चालक पळून गेला. चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Read More