Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

VIDEO : तृतियपंथियाला मॉलनं नाकारली एन्ट्री, मानवाधिकार आयोगाकडे दाद मागणार

पुण्यातील एका मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

VIDEO : तृतियपंथियाला मॉलनं नाकारली एन्ट्री, मानवाधिकार आयोगाकडे दाद मागणार

पुणे : पुण्यातील एका मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

विमाननगर परिसरात 'फोनिक्स मोर्केट सिटी' हा मॉल आहे. या ठिकाणी सोनाली ही तृतीयपंथी आपल्या मित्रासोबत गेली होती. त्यावेळी तिला प्रवेशद्वारावरच अडवण्यात आलं.

मॉलमध्ये 'तृतियपंथियांना प्रवेश नसल्याचं' कारण तिला सांगण्यात आलं. सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर या प्रकारबद्दल संताप व्यक्त होत आहे. श्याम कोन्नूर या सोनियाच्या मित्रानं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. 

दरम्यान, आपला सोनालीचा अवमान करण्याचा हेतू नव्हता. यापूर्वी तृतियपंथियांकडून आलेला अनुभव चांगला नसल्यानं सोनालीला प्रवेश नाकारण्यात आल्याचं स्पष्टीकरण फोनिक्स मार्केट सिटीतर्फे देण्यात आलंय. 

आम्हाला माणूस म्हणून जगू द्या... मी सहन केलं पण इतरांनी या गोष्टी सहन करू नयेत... यासाठीच या घटनेबद्दलची आपण तक्रार दाखल करणार असून मानवाधिकार आयोगाकडेची आपण दाद मागणार असल्याचं पीडित सोनाली दळवी यांनी म्हटलंय.
Read More