Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

तुकाराम मुंडे अध्यक्ष झाल्यावर पीएमपीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ

पुण्यातल्या पीएमपीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून सार्वजनिक बससेवेच्या परिस्थितीत सुधारणा होत असल्याचं मत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केलं आहे. 

तुकाराम मुंडे अध्यक्ष झाल्यावर पीएमपीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ

पुणे : पुण्यातल्या पीएमपीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून सार्वजनिक बससेवेच्या परिस्थितीत सुधारणा होत असल्याचं मत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केलं आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाला प्रवासी वाहुतकीपासून मिळणा-या उत्पन्नात चालू आर्थिक वर्षात उल्लेखनीय वाढ झाली असल्याचं अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी सांगितलं.

पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नात पावणेसात लाख रुपयांनी, तर प्रवासी संख्येत ५० हजार ८११ इतकी वाढ झाल्याचं मुंडे म्हणाले. यामुळे एकूणच पीएमपीचा आर्थिक तोटा कमी व्हायला मदत होणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 

 

Read More