Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धावत्या बसखाली सापडून दुचाकीस्वार ठार

 धावत्या बसखाली सापडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू 

धावत्या बसखाली सापडून दुचाकीस्वार ठार

पुणे : पुण्यात धावत्या बसखाली सापडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. आकाश विधाते अस अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचं नाव आहे. रविवारी दुपारी बाराच्या दरम्यान रस्त्यावर हा अपघात घडला. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात दु:ख व्यक्त केले जात आहे.

आकाश विधाते त्याच्या स्पोर्ट्स बाईक वरून जात होता. त्यावेळी त्याच्या गाडीला एका रिक्षाची धडक बसली. त्यामुळे तो गाडीसह फरफटत गेला. मात्र त्याचवेळी स्वारगेट कडून टिळक चौकाच्या दिशेने जाणाऱ्या बस खाली तो आला. त्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यातून या घटनेचा तपशील स्पष्ट झाला आहे. स्थानिक पोलीस स्थानकात याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांमार्फत केले जात आहे. 

Read More