पुण्याला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. पण या पुण्यातच लाजीरवाणा प्रकार घडला आहे. एका किरकोळ वादावरुन पुण्यात महिलांच्या दोन गटात हाणामारी झाली आहे. यामध्ये एक महिला आणि पुरुष जखमी झाला आहे. हा सगळा प्रकार पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये घडला आहे. या महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पुण्यातील कदमावकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इराणी वस्तीत ही हाणामारी झाली आहे. हा वाद नेमका कशावरुन झाला हे अद्याप कळलेलं नाही. पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी तातडीने त्या परिसरात धाव घेतली.
Pune | पुण्यात महिलांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी#pune #zee24taas pic.twitter.com/wv8hVhHm7n
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 4, 2025
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार गणेश सातपुते, संभाजी देवकर आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.