Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यात गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात सलग तिसरी गर्भाशय प्रत्त्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

पुण्यात गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे : पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात सलग तिसरी गर्भाशय प्रत्त्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

प्रजासत्ताक दिनी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. बेळगावमधल्या एका २८ वर्षीय महिलेला तिच्या 52 वर्षीय आईने गर्भाशय दान  केलं. आईच्या शरीरतील गर्भाशय काढून ते मुलीच्या  गर्भाशयात प्रत्त्यारोपण करण ही संपुर्ण प्रक्रिया, अवघ्या साडेसहा तासांमध्ये करण्यात आली.

गेल्या वर्षी मे महिन्यात देशातली पहिल्या गर्भाशय प्रत्त्यारोपणाची शस्त्रक्रिया गॅलेक्सी केअर रुग्णालयात पार पडली होती. त्यावेळी दोन महिलांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 

Read More