Trending News : पुणे तिथे काय उणे असं नेहमी म्हटलं जातं. कोणत्याही प्रश्नावर पुणेकरांकडे (Pune) तोडगा असतो. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. एका रिक्षावाल्याने (Auto Rikshaw) चक्क पायाने लाखो रुपयांची मर्सिडिस (Mercedes) कार ढकलत नेली. याचा व्हिडिओ (Video) आता सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. एका दुचाकीमधलं पेट्रोल संपलं की दुसरा दुचाकी चालक धक्का मारत ती गाडी पेट्रोल पंपपर्यंत नेतो. रस्त्यावर ही दृष्य बघणं काही नवी नाही. पण चक्क मर्सिडीज कारला पायाने धक्का मारतानाचं दृष्य पहिल्यांदाच पाहिला मिळालं.(Auto Rickshaw Driver Pushed Mercedes Car In Pune)
पुण्यातला व्हिडिओ होतोय व्हायरल
एक रिक्षावाला लक्झरी कारला पायाने धक्का मारत नेत असल्याचं पुणेकरांनी पहिल्यांदाच पाहिलं. हा अजब गजब प्रकार कोणतरी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला तो सोशल मीडियावर शेअर केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओत लाल रंगाची मर्सिडीज बेंज सीएलए 200 डी कार दिसत आहे. या कारची किंमत जवळपास 40 लाख रुपये इतकी आहे.
मर्सिडिजला धक्का मारण्याची वेळ
व्हायरल होणारा हा व्हिडिओ पुण्यातला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क रोडवर एका मर्सिडीस कारमधलं पेट्रोल संपल्याने कार बंद पडली. जवळपास एकही पेट्रोलपंप नसल्याने मर्सिडीस चालकासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. त्याचवेळी त्याच्या मदतीला पुण्यातील रिक्षावाला धावून आला. त्या रिक्षावाल्याने मर्सिडीसला पायाने धक्का मारत कार पेट्रोल पंपपर्यंत नेण्यास मदत केली. याच दरम्यान कोणतीही हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला.
KP
— पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@PuneriSpeaks) December 15, 2022
संकटकाळी मदतीला येणारा एक रिक्षावाला मित्र पाहिजेच... pic.twitter.com/qRpcm2F8RX
हे ही वाचा : किती ते माबोईलचं वेड, तब्बल तीन दिवस डोंगरावरील कपारीत अडकला, वाचा नेमकं काय झालं
लोकांचा मजेदार प्रतिक्रिया
या व्हिडिओवर लोकांच्या मजेदार प्रतिक्रिया येत आहेत. पुण्यात रिक्षाला पर्याय नाही असं कही जणांनी म्हटलं आहे. तर अनेकांनी त्या रिक्षावाल्याचं कौतुक केलं आहे. काही जणांनी नाद करा पण पुण्यातील रिक्षावाल्यांचे कुठे असंही म्हटलं आहे. अनेकांनी रिक्षाचालकाच्या जिद्दीचंही कौतुक केलं आहे.