Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Pune: पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या समितीत राहुल सोलापूरकर यांचे नाव; पुन्हा मोठा वाद पेटणार?

Pune News:अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या नावामुळे पुन्हा एकदा मोठा वाद होण्याची शक्यता आहे. कारण पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या समितीत राहुल सोलापूरकर यांचे नाव आहे.

Pune: पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या समितीत राहुल सोलापूरकर यांचे नाव; पुन्हा मोठा वाद पेटणार?

Rahul Solapurkar: छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस वक्तव्य केल्यामुळे अभिनेता राहुल सोलापूरकर वादात सापडले होते.  छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत  राहुल सोलापूरकरयांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात मोठा वाद पेटला होता. राहुल सोलापूरकर यांच्यामुळे पुन्हा एकदा मोटा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

पुणे महापालिकेत पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याचा प्रस्ताव आहे. पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याच्या सल्लागार समितीमध्ये राहुल सोलापूरकर यांचे देखील नाव आहे.  मागील तीन वर्षांपासून पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याचे काम सुरू. हे धोरण ठरवणाऱ्या सल्लागार समितीमध्ये राहुल सोलापूरकर यांचे नाव आहे. मात्र,  अजून प्रस्तावाला मंजुरी मिळाले नसल्याचे समजते.  सोलापूरकर यांचे नाव आधीपासूनच या समितीत आहे. मात्र, आता त्यांचे नाव समोर आले आहे.  राहुल सोलापूरकर यांच्या नावामुळे वादाची शक्यता आहे.    

जितेंद्र आव्हाड यांची टीका

पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या समितीत राहुल सोलापूरकर यांचे नाव असल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी  राहुल सोलापूरकर यांच्या नावावर आक्षेप घेतला आहे. तसेच  राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  पुण्याचे सांस्कृतिक धोरण आणि अंमलबजावणी यासाठी एक समिती निर्माण करण्यात आली. या समितीमध्ये 'थोर' इतिहास संशोधक राहुल सोलापूरकर यांना संधी देण्यात आली.  आता आपल्याला कळलेच असेल की, सोलापूरकर जे बोलतो ते कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो आणि त्याला राजाश्रय कुणाचा आहे असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. 

Read More