Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भीषण अपघात : शिवशाही आणि साध्या एस.टी बसची टक्कर

शिवशाही बस आणि साध्या एसटी बसची टक्कर होऊन भीषण अपघात झालायं.

भीषण अपघात : शिवशाही आणि साध्या एस.टी बसची टक्कर

रायगड : अलिबागजवळच्या कार्ले खिंड गावात मुरुडहून स्वारगेटला जाणारी शिवशाही बस आणि साध्या एसटी बसची टक्कर होऊन भीषण अपघात झालायं. या अपघातात एसटीच्या ड्रायव्हरसह पंधरा जण जखमी आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. सकाळी साडेनऊच्या सुमाराला हा अपघात झाला.

 

पंधराजण जखमी 

कार्ले खिंड अलिबाग येथे शिवशाही बस आणि साध्या एस टी बसची  समोरासमोर धडक झाल्याची घटना सकाळी घडली आहे. या भीषण अपघातात एस.टी ड्रायव्हर  आणि 15 प्रवाशी जखमी आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ही घटना घडताच स्थानिक आणि इतर गाड्यांमधील प्रवाशी मदतीला धावले. पोलीसही घटनास्थळी पोहोचले असून ते अधिक पाहणी करत आहेत. 

वाहतूक कोंडी

या अपघातामुळे वडखळ मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. यासाठी शेजारील रस्त्यावरून पर्यायी मार्ग आहे पण त्यावरून लहान वाहन जाऊ शकतात. अजून एक ते दीड तास ही वाहन हटविण्यास जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

Read More