Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पावसाची संततधार सुरूच... वसई, विरारमध्ये पाणी साचलं

 नालासोपारा आणि विरारमध्येही काही ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. 

पावसाची संततधार सुरूच... वसई, विरारमध्ये पाणी साचलं

वसई : वसई विरार परीसरातही पावसाने दमदार हजेरी लावलीय. पहाटे चारपासूनच या ठिकाणी पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळे वसईच्या समता नगर, साई नगर,ओम् नगर, या भागात रसत्यावर पाणी साचलंय. आता पावसाचा जोर कमी झालाय.  तर नालासोपारा आणि विरारमध्येही काही ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय.

२४ तासात मुसळधार 

मुंबईत पावसाने जोरदार कमबॅक केलंय. मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. मुंबईत परळ, दादर, माहीम, वांद्रे, अंधेरी, मालाड, कांदिवली आणि बोरीवलीत जोरदार पाऊस सुरु आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही रात्रीपासून पावसाने हजेरी लावलीय. तिकडे पालघर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावलीय. पहाटे पासून जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पालघर शहरासह ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलाय.

नागरिकांना दिलासा 

या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावलीय. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन परिसरात पाऊस सुरु आहे. येत्या २४ तासांत कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. 

Read More