पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि घाट भागात पुढील चार ते पाच दिवस अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. हवामान खात्याने मंगळवारी राज्याला कोणताही अलर्ट नसला तरी बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावरील परिसरांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी रायगड, सिंधुदुर्गसह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील परिसरांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरावर सातत्याने ढग दाटून येत असले तरी पावसाने मुंबईकडे पाठ फिरविली आहे. एखादी पडणारी सर वगळता, मुंबई अद्यापही कोरडीच आहे