Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राईनपाडा हत्याकांडातील २४ आरोपींना पोलीस कोठडी

राईनपाडा हत्याकांडातील २४ आरोपींना पोलीस कोठडी

धुळे : राईनपाडा हत्याकांड प्रकरणी २४ आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. साक्री न्यायालयाने हा निर्णय दिलायं. रविवारी सकाळी धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा गावात मुलांना पळवणारी टोळी समजून जमावानं पाच जणांना बेदम मारहाण केली. त्यात पाचही जणांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात हे पाच जण सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातून भिक्षा मागण्यासाठी  रानाईनपाड्य़ात आले होते.

मुख्य आरोपीला अटक 

राईनपाडा हत्याकांडाचा मुख्य आरोपी महारू पवारला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. कोकणीपाडा येथुन नातेवाईकाच्या घरातून त्याला अटक करण्यात आली आहे. धुळे तालुका पोलिसांच्या पथकाला तपासात मोठं यश आलं आहे. आरोपींना आश्रय देणाऱ्यावरही पोलीस गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 

Read More